Breaking

समीर मुजावर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

समीर मुजावर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

WhatsApp Group

Join Now

अंबाजोगाई – बीड येथून आंबेजोगाई शहर पोलीस स्टेशनला बदली होऊन आलेले समीर मुजावर यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जिल्ह्यातील पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याच्या उद्देशाने मागील महिन्यात 26 मे रोजी जिल्ह्यातील 603 पोलीस कर्मचाऱ्यांच्या एकाच वेळी ते कार्यरत आसलेल्या तालुक्याच्या बाहेर बदल्या करुंन पोलीस खात्या मध्ये बॉम्ब उडवून दिला.
या बदलीने असंख्य पोलीस कर्मचारी नाराज होते. या नाराजी नाट्ट्या मधून काही कर्मचाऱ्यांनी मॅट कोर्टात धाव घेतली आहे. अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनलाही 26 पोलीस कर्मचारी बदली होऊन आलेले असून या पैकी बार्शी येथील रहिवासी असलेले समीर मुजावर (वय 42) हे ही एक होते. मुजावर हे बार्शीचे राहिवासी असल्याने त्यांचा स्व जिल्ह्यात म्हणजे सोलापूर जिल्ह्यात बदली साठी प्रयत्न सुरु होता. मागील 2 दिवस ते पोलीस स्टेशनच्या कामासाठीच मंबईला गेले होते आणि रात्रीच परत अंबाजोगाईला आले होते. आज आपल्या अन्य सहकाऱ्या सोबत चनई रोडवरील किरायाने घेतलेल्या रूममध्ये मुजावर असतानाच त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे दुःखद निधन झाले. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात सध्या त्यांच्या शवविच्छेदची प्रक्रिया सुरु असून त्यांच्या पश्चात पत्नी 2 मूले व अन्य परिवार आहे. मुजावर यांच्या दुःखद निधना मूळे पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त होतं आहे.

Last Updated: June 20, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.