Breaking

सालगडी शेतमालकाच्या घरातून ४० हजार रुपये घेऊन फरार

Updated: सप्टेंबर 16, 2025

By Vivek Sindhu

सालगडी शेतमालकाच्या घरातून ४० हजार रुपये घेऊन फरार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – शेतमालकाच्या घराच्या कपाटात ठेवलेली ४० हजार रुपयांची रक्कम घेऊन सालगडी आपल्या पत्नीसह पसार झाल्याची घटना होळ (ता. केज) शिवारात घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
होळ येथील शेतकरी विवेक रामराव शिंदे यांची शिवारातील गट नं. ३२१ मध्ये रामगंगा नावाच्या शेतात जमीन असून त्यांच्या शेतातील व घरातील कामासाठी सालगडी म्हणून वरदगाव (ता. येवला जि. नाशिक) श्रावण गणपत पवार व त्यांची पत्नी सोनाली श्रावण पवार हे दाम्पत्य होते. ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता शेतातील व घरातील कामे करून त्यांच्या रूमवर गेले. दुसऱ्या दिवशी हे दाम्पत्य गायब झाल्याने त्यांनी घरातील लाकडी कपाटाची पाहणी केली असता कपाटात ठेवलेली ४० हजार रुपयांची दिसून आली. या सालगडी पवार दाम्पत्याने ४० हजार रुपयांची रक्कम चोरून नेत दोघे पसार झाल्याची तक्रार विवेक शिंदे यांनी दिली. या तक्रारीवरून श्रावण पवार, सोनाली पवार या दोघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार सुरेश गित्ते हे करीत आहेत.


Categories

Recent Posts