Breaking
Updated: नोव्हेंबर 19, 2025
आ. नमिता मुंदडा यांची उपस्थिती; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआ. नमिता मुंदडा यांची उपस्थिती; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अंबाजोगाई : अंबाजोगाई नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहर परिवर्तन जनविकास आघाडीने प्रभाग क्रमांक ३ मधून प्रचाराचा औपचारिक शुभारंभ केला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा (काकाजी) तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार सारंग अरुणराव पुजारी आणि शेख नाजनीन अजीम यांच्या प्रचाराची आज सुरुवात झाली. प्रचाराचे उद्घाटन आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी पायी फिरत रॅलीत सहभाग घेत नागरिकांशी संवाद साधला आणि आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.
प्रचाराची सुरुवात चौभारा येथील गणेश मंदिरात आरती व श्रीफळ फोडून करण्यात आली. त्यानंतर ही रॅली चौभारा, काळम पाटील गल्ली, भटगल्ली, कुत्तर विहीर, जैन गल्ली, महावीर चौक, खतीब गल्ली, झारे गल्ली आणि कोठाड गल्ली या परिसरात पोहोचली. या रॅलीत आ. नमिता मुंदडा यांच्यासह सारंग पुजारी, अजीम जरगर, सर्व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येक ठिकाणी त्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. नागरिकांशी संवादादरम्यान आ. नमिता मुंदडा आणि उमेदवारांनी गेल्या काही वर्षांत झालेल्या विकासकामांचा आढावा दिला. शहराला दोन दिवसाला खात्रीशीर पाणीपुरवठा करण्यासाठी सुरु असलेल्या २०६ कोटींच्या नळयोजनेबद्दल नागरिकांना अवगत करण्यात आले. गल्लीबोळात झालेले सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते, स्वच्छता व्यवस्था, नाली व्यवस्थापन, सामाजिक सुविधा आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत झालेली प्रगती यासंबंधी माहिती देण्यात आली. शहराच्या पुढील विकासासाठी स्थिर, जबाबदार आणि पारदर्शक नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत नागरिकांना आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास ठेऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रभाग ३ मधील नागरिकांनी या प्रचारयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रस्ते-सुविधा, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि स्वच्छता या मूलभूत समस्यांवर ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचा संकल्प शहर परिवर्तन जनविकास आघाडीने व्यक्त केला आहे. आगामी काळात सर्व प्रभागांमध्ये असेच व्यापक जनसंवाद कार्यक्रम राबवून विकासाचा आराखडा नागरिकांसमोर मांडण्याचे आघाडीचे नियोजन आहे. निवडणूक प्रचाराचा पहिला दिवस उत्साहात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला असून, आगामी दिवसांत आघाडीच्या प्रचारात आणखी जोम येणार आहे.