Breaking
Updated: एप्रिल 4, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत सादोळ्याचा दुचाकीस्वार ठार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगा:व तालुक्यातील सादोळा येथे पंढरपूर–खामगाव महामार्गावर आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशोक जिजाभाऊ गोजे (वय ४०, रा. सादोळा) असे या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने गोजे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक गोजे हे आपल्या कामासाठी दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला. धडक इतकी भीषण होती की गोजे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच प्राण गेला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना पाचारण केले. माजलगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या अपघातामुळे सादोळा परिसरात मोठी शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. फरार झालेल्या अज्ञात वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारे तपास चक्रावून फिरवली आहेत. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.