Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

रोटरीच्या वतीने शीत शवपेटीचे लोकार्पण

Updated: फेब्रुवारी 24, 2026

By Vivek Sindhu

रोटरीच्या वतीने शीत शवपेटीचे लोकार्पण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

दुःखाच्या क्षणी आधार देणे हीच खरी मानवता – निलेश वाईकर

अंबाजोगाई -: लोकांच्या दुःखात आधार देणे हीच खरी मानवता आहे.असे प्रतिपादन रोटरीचे प्रांत पब्लिक इमेज डायरेक्टर निलेश वाईकर यांनी केले. रोटरीच्या १२१ व्या वर्धापन दिनानिमित रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने उम्मीद ट्रस्ट संचलित जनसेवा हॉस्पिटल चे संचालक डॉ. तौफिक खान पठाण यांच्या कडे शीत
शीत शवपेटीचे (मोर्चुरी बॉक्स )लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निलेश वाईकर बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलिस निरीक्षक शरद जोगदंड, रोटरीच्या अध्यक्षा प्रा. रोहिणी पाठक, उपाध्यक्ष धनराज सोळंकी, सचिव मंजुषा जोशी, सहसचिव राधेश्याम लोहिया, प्रा.संतोष मोहिते पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शरद जोगदंड म्हणाले की अंबाजोगाई व परिसरात रोटरीने अनेक सामाजिक कार्यक्रम राबविले आहेत.उपेक्षितांना प्रवाहात आणण्याचे काम विविध माध्यमातून रोटरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी आपल्या प्रास्ताविकात प्रा.रोहिणी पाठक यांनी भूमिका मांडताना सांगितले की गरजू कुटुंबांना अत्यंत कठीण प्रसंगी सन्मानपूर्वक सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतूने शीत शवपेटी “उम्मीद ट्रस्ट संचलित जनसेवा हॉस्पिटल चे संचालक डॉ. तौफिक खान पठाण ” यांना सुपूर्द करण्यात आली आहे. अंबाजोगाईकरांची शव शीत पेटीची गैरसोय दुर झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी टी.आर.एफ. डायरेक्टर डॉ नवनाथ घुगे यांना पाचव्यांदा पी.एच.एफ. झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
धनराज सोळंकी यांनी शीत शवपेटी लोकार्पण मागील हेतू विषद केला ,पब्लिक इमेज डायरेक्टर अविनाश मुडेगावकर यांनी आतापर्यंत झालेल्या रोटरी प्रकल्पांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचलन प्रा. संतोष मोहिते यांनी केले. तर उपस्थितांचे आभार कल्याण काळे यांनी मानले.याप्रसंगी रोटरीचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ सुरेश आरसुडे ,अंगद कराड, ओमकेश दहिफळे, प्रदीप झरकर, प्रवीण चोकडा, स्वप्नील परदेशी ,मोईन शेख, शकील शेख, राजेंद्र घोडके, अजित देशमुख, गोपाल पारीख, आनंद जाजू, भीमासेन लोमटे,राम सारडा, रमेश देशमुख, बालाजी घाडगे , रुपेश रामावत अभिषेक मुंदडा,गणेश राऊत, प्रा. अजय पाठक, मयुर परदेशी, यांची उपस्थिती होती.


Categories

Recent Posts