Breaking
Updated: July 18, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupअंबाजोगाई -: रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने बसस्थानक परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पोलिस बांधवांसाठी निवारा म्हणून पोलिस चौकीची निर्मिती करण्यात आली. या चौकीचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थित झाला.
या लोकार्पण समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, नायब तहसीलदार स्मिता बाहेती,नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, रोटरीच्या अध्यक्षा प्रा रोहिणी पाठक सचिव मंजुषा जोशी,सामाजिक कार्यकर्ते आनंद कर्णावट, इनरव्हीलच्या अध्यक्षा संगीता नावंदर,
रोटरॅक्टचे अध्यक्ष जतिन कर्णावट,सचिव
अभिजीत पारीख, नूतन अध्यक्ष विशाखा बजाज, नूतन सचिव मयुर परदेशी यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना चेतना तिडके म्हणाल्या की
रोटरॅक्ट क्लबच्या युवकांनी नवनिर्मितीच्या माध्यमातून ही चौकी निर्माण करून पोलिस यंत्रणेला मोठी मदत केली आहे. समाजातील उपेक्षितांना न्याय देण्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जतिन कर्णावट यांनी रोटरॅक्ट क्लब सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगितले. बसस्थानक परिसरात सेवा देणाऱ्या बांधवांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व सोयींनी ही चौकी निर्माण करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत चौकीचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे संचालन शिवानंद मोरे यांनी केले . तर उपस्थितांचे आभार स्नेहल नागरगोजे यांनी मानले.
यावेळी रोटरॅक्ट सदस्य सतीश चौधरी, दिनेश सोमवंशी, संदीप जाधव,रमण बजाज, आशिष चौसाळकर, सर्वेश बजाज, रमण भन्साळी, जयदेव पारिख, समीर फड, सम्यक कर्नावट, सुधीर गिल्डा यांची उपस्थिती होती.