Breaking
Updated: ऑक्टोबर 11, 2025
रोटरीच्या नेशन बिल्डर अवॉर्ड पुरस्कारांचे वितरण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई – : येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या नेशन बिल्डर अवॉर्ड या पुरस्काराचे वितरण खोलेश्वर महाविद्यालयाच्या गोपीनाथराव मुंडे सभागृहात झाले.
शिक्षकांचा सन्मान, शांतीचे मूल्य आणि विद्यार्थ्यांची प्रेरणा हेच या उपक्रमाचे खरे उद्दिष्ट होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणतज्ज्ञ
महेश पाटील,तर व्यासपीठावर
सहाय्यक प्रांतपाल प्रवीण देशपांडे, रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रा रोहिणी पाठक, सचिव मंजुषा जोशी, प्रकल्प संचालक प्रा.संतोष मोहिते,राजेंद्र घोडके,
यांची उपस्थिती होती. आपल्या मार्गदर्शनात महेश पाटील यांनी सध्याच्या शिक्षण पद्धतीत शिक्षक ,मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील समन्वय आणि जे ई ई, नीट या स्पर्धात्मक परीक्षेत
हे आहेत पुरस्काराचे मानकरी:
नेशन बिल्डर अवॉर्ड या पुरस्काराने लेफ्ट. डॉ साधना चामले- पन्हाळे(योगेश्वरी महाविद्यालय), सुरेखा काळे(खोलेश्वर शाळा), रागीणी पवार (मुकुंदराज विद्यालय) , स्नेहल लाखे (जिल्हा परिषद,ममदापूर) , सय्यद अफसान बेगम(मिलिया उर्दू स्कूल),
शांतता सप्ताहातील बक्षिसे:
शांतता सप्ताह मध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा यातील बक्षीस पात्र विद्यार्थी.चित्रकला — प्रथम श्रेया मानकरी, द्वितीय .ईशान वाडखेलकर आणि सौमित्र रामदासी, तृतीय आस्था ढेले आणि स्वराली घाडगे,उत्तेजनार्थ गायत्री काकडे.
निबंध स्पर्धा – प्रथम तन्मय पवार, द्वितीय मानसी जोगी आणि प्रज्वल पाटोळे, तृतीय आनंदी गीते आणि फायजा मुंशी, उत्तेजनार्थ आरोही राजमाने.