Breaking

महाराष्ट्रात जम्बो पोलीस भरती! १५ हजार पोलीस पदांसाठी भरतीला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी

Updated: ऑगस्ट 12, 2025

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2025 08 12 at 12.56.14 e30bd6b8

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मुंबई : महाराष्ट्रातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज, मंगळवार दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत पोलिस दलात तब्बल १५ हजार नवीन भरतींना मंजुरी देण्यात आली. हा निर्णय उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

या निर्णयामुळे राज्यातील रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ होणार असून, पोलिस दलात नव्या आणि ताज्या दमाच्या तरुणांचा समावेश होईल. मंत्रिमंडळाच्या या मान्यतेनंतर पोलीस भरतीसंदर्भातील अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पोलीस सेवेत दाखल होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नव्या भरतीची गरज असल्याचे शासनाचे मत आहे. या भरतीमुळे पोलिस दलाला नवीन ऊर्जा आणि बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महायुती सरकार आल्यानंतर पोलीस भरती कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयामुळे या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला असून, भरती प्रक्रियेचे वेळापत्रक आणि पात्रतेसंबंधीची माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.


Categories

Recent Posts