Breaking
Updated: ऑक्टोबर 3, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी)- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणीही हार, बुके, शाल आणू नयेत त्याऐवजी पुरग्रस्तांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठीची मदत जमा करावी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी ३१ लक्ष ८४ हजार ८४० रुपयांचा निधी जमा केला.
संपुर्ण महाराष्ट्रात या वर्षी मोसमी पावसाने कहर केला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह शेत जमिन ही वाहुन नेली. राज्यातील शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या अस्मानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना मुख्यमंत्री पुरग्रस्त सहाय्यता निधीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत नंदकिशोर मुंदडा यांनी केज विधानसभा मतदार संघातील नागरिकांना आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणीही शाल, हार, बुके आणू नयेत, त्या ऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी मदत आणून जमा करावी असे आवाहन केले होते. सदरील आवाहनाला प्रतिसाद देत नंदकिशोर मुंदडा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या त्यांच्या हितचिंतकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी ठेवण्यात आलेल्या बॉक्स मध्ये भरभरून मदत केली. आज या रकमेची मोजदाद केली असता ३१ लाख ८४ हजार, ८३४ रुपयांचा भरघोस निधी जमा झाल्याचे दिसून आले.
नंदकिशोर मुंदडा यांनी आपल्या हवामानानुसार नागरिकांनी केलेल्या या मदत निधीचे कौतुक केले असून लवकरच हा निधी मुंबई येथे ना. पंकजा मुंडे यांच्या समवेत जावून मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करणार असल्याचे सांगितले.