Breaking
WhatsApp Group
Join Nowअंबाजोगाई : पुण्यातील घर व कमर्शियल स्पेस घेण्याची सुवर्णसंधी प्रथमच अंबाजोगाईकरांच्या दारी आली आणि नागरिकांनीही या संधीचे सोनं केले. रविवार, २२ जून २०२५ रोजी हॉटेल पियुष इन, मोंढा रोड, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो’ ला अंबाजोगाईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
24 रिलेटर्स आणि आरएन वीट उद्योग यांच्या पुढाकारातून आयोजित या एक्स्पोमध्ये पुण्यातील नामांकित बिल्डर्सच्या निवासी आणि कमर्शिअल प्रकल्पांची सविस्तर माहिती देण्यात आली. एफसी रोडवरील कमर्शियल प्रोजेक्टसह खराडी-मांजरी रोड येथील अत्याधुनिक रहिवासी प्रकल्पांबाबत थेट मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रकल्पांच्या किंमती, फायनान्सिंगचे पर्याय, बुकिंग प्रक्रिया, तसेच हक्काचे घर आणि व्यवसायासाठी जागा घेण्यासाठी असणाऱ्या अटी-शर्तींबाबत थेट मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे, तत्काळ बुकिंग करणाऱ्यांना स्पेशल दरासह ५ ग्रॅम सोनं मोफत देण्यात आलं, ही बाब नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या उपक्रमाला अंबाजोगाईकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. 24 रिलेटर्स आणि आरएन वीट उद्योग या दोन्ही विश्वासार्ह आयोजाकांमुळे अनेक नागरिकांनी प्रत्यक्षात बुकिंग करत पुण्यात घर किंवा ऑफिस घेण्याचा निर्णय घेतला. “अशा प्रकारचा प्रॉपर्टी एक्स्पो अंबाजोगाईत प्रथमच पाहायला मिळाला. पुण्यात स्थायिक होण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात येणार आहे,” अशा भावना सहभागी नागरिकांनी व्यक्त केल्या.
24 रिलेटर्सच्या प्रतिनिधींनी सांगितले की, अंबाजोगाईतून मिळालेला प्रतिसाद अपेक्षेपेक्षा अधिक आहे. अंबाजोगाईतील अनेक नागरिक पुण्यात स्थायिक होण्याची इच्छा बाळगतात. मात्र योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे ते निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी एक्स्पो घेऊन नामांकित बिल्डर्सना अंबाजोगाईत आणण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. या उपक्रमामुळे अंबाजोगाईकरांना स्थानिक पातळीवरच एक विश्वासार्ह आणि मार्गदर्शक व्यासपीठ मिळाले, असे अनेकांनी सांगितले. हा प्रॉपर्टी एक्स्पो यशस्वी ठरल्यामुळे पुण्यात गुंतवणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांना भविष्यात अजूनही अशाच संधी मिळणार आहेत, हे निश्चित!
Last Updated: June 23, 2025