Breaking
WhatsApp Group
Join Nowपुण्यात घर आणि कमर्शियल स्पेस घेण्याची संधी आता अंबाजोगाईकरांच्या दारी!
अंबाजोगाई : पुणे शहरातील शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि आयटी क्षेत्रात अंबाजोगाईतील नागरिकांचा मोठा सहभाग असूनही, अनेकांना अजूनही पुण्यात स्वतःचे घर घेता आलेले नाही. मात्र आता पुणे शहरातील प्रतिष्ठित एफसी रोड आणि खराडी – मांजरी रोड परिसरातील अत्याधुनिक प्रोजेक्ट्सची सविस्तर माहिती आता अंबाजोगाईमध्ये मिळणार आहे. मित्तल ब्रदर्स आणि गोदरेज प्रॉपर्टीज यांच्यासह इतर नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी आयोजित केलेला खास प्रॉपर्टी एक्स्पो रविवार, दिनांक २२ जून २०२५ रोजी हॉटेल पियुष इन, मोंढा रोड, अंबाजोगाई येथे पार पडणार आहे.
या प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये एफसी रोडवरील ‘वन प्लेस’ हा अत्यंत मागणी असलेला कमर्शियल प्रोजेक्ट आणि ‘गोदरेज पार्क स्प्रिंग्स’ या रहिवासी प्रकल्पाबद्दल इत्यंभूत माहिती देण्यात येणार आहे. मित्तल ब्रदर्स यांचा ‘वन प्लेस’ हा प्रोजेक्ट पुण्यातील अत्यंत प्रतिष्ठित आणि उच्च मागणी असलेल्या एफसी रोड या भागात विकसित होत आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात स्थित असलेला हा प्रकल्प व्यवसायासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. वाढत्या शहरामध्ये कमर्शियल स्पेसची किंमत आणि महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून,‘वन प्लेस’’ हा प्रकल्प भविष्यातील हमखास उत्पन्न देणारी स्मार्ट गुंतवणूक ठरू शकते.
गोदरेज प्रॉपर्टीज या देशातील विश्वासार्ह ब्रँडचा हा प्रीमियम प्रोजेक्ट पुण्यातील खराडी – मांजरी रोड या वेगाने विकसित होणाऱ्या परिसरात विकसित होत आहे. या प्रकल्पात अत्याधुनिक सुविधा, शांततामय वातावरण, सुरक्षितता आणि उत्तम जीवनशैली मिळेल, अशी खात्री देण्यात आली आहे.
आधुनिक सुविधा, प्रीमियम दर्जा आणि भविष्यातील सुरक्षित उत्पन्न यासाठी हे प्रोजेक्ट्स गुंतवणुकीच्या दृष्टीने उत्तम पर्याय आहेत. विशेष म्हणजे, हा प्रॉपर्टी एक्स्पो अंबाजोगाईमध्ये प्रथमच आयोजित होत आहे. अनेक युवकांचे शिक्षण आणि नोकरी पुण्यात असूनही कायमचा पत्ता अजूनही अंबाजोगाईचा आहे. हीच गरज लक्षात घेऊन पुण्यात स्वतःच्या हक्काच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी जागा घेण्याची ही एक अनमोल संधी आहे.
या प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये सहभागी होणाऱ्यांना प्रकल्पासंदर्भात संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. किंमत, फायनान्सिंगचे पर्याय, आणि घर घेण्यासाठी असणाऱ्या अटी-शर्तींबाबत थेट मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या एक्स्पोमध्ये तात्काळ बुकिंग करणाऱ्यांना विशेष सवलतीसह स्पेशल दर देण्यात येणार असून, ५ ग्रॅम सोनंही मोफत मिळणार आहे. ही संधी अत्यंत मर्यादित कालावधीसाठी असल्यामुळे इच्छुकांनी इव्हेंटमध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अधिक माहितीसाठी 88050 25090 किंवा 9049177977 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. या उपक्रमाच्या माध्यमातून पुण्यात स्थायिक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अंबाजोगाईतील नागरिकांना स्थानिक पातळीवरच एक व्यासपीठ मिळत असून, अशा प्रकारचे एक्स्पो हे उपयुक्त व मार्गदर्शक ठरणार आहेत.
Last Updated: June 22, 2025