Breaking

प्रियदर्शनी सांस्कृतिक व क्रीडा मंडळाची ढोलताशा पथकांची भव्य स्पर्धा उत्साहात संपन्न

Updated: सप्टेंबर 5, 2025

By Vivek Sindhu

सलग तिसऱ्या वर्षी तरुण गणेश मंडळ ठरले अव्वल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

सलग तिसऱ्या वर्षी तरुण गणेश मंडळ ठरले अव्वल

पुस्तकांच्या गावाप्रमाणेच अंबाजोगाई आता ढोल ताशा पथकांसाठीही प्रसिद्ध होईल – अभिजीत जोंधळे

अंबाजोगाई : प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित भव्य ढोलताशा वाद्य पथक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या स्पर्धेत तरुण गणेश मंडळ कुत्तर विहीरच्या पथकाने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावत आपली छाप कायम ठेवली.

स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात साहित्यिक आणि पुस्तकप्रेमी अभिजित जोंधळे यांनी अंबाजोगाई शहर पुस्तकांच्या गावासोबतच ढोलताशा पथकांसाठीही प्रसिद्ध होईल, अशी भावना व्यक्त केली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, प्रकाश सोळंकी, प्रा. वसंत चव्हाण, पुरुषोत्तम चोकडा, अरुण काळे,बबन लोमटे, ऍड विष्णुपंत सोळंके, मनोज लखेरा, महादेव आदमाने ,संकेत मोदी, ऍड अनिल लोमटे, ,दिनेश भराडीया , धम्मा सरवदे ,अमोल लोमटे, सुनील वाघाळकर , अकबर पठाण, शाकेर काजी, खलील जाफरी, डिंपल मोदी, साक्षी सारडा, मेघा उपाध्याय यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ढोलताशा स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांकाचे ३१,००१ रुपये व सन्मानचिन्ह तरुण गणेश मंडळ कुत्तर विहीरला मिळाले. दुसरा क्रमांक अंबाजोगाईचा राजा श्रीसाई गणेश मंडळ अण्णाभाऊ साठे चौक यांना मिळाला असून त्यांना २१,००१ रुपये प्रदान करण्यात आले. तिसऱ्या क्रमांकाचे १५,००१ रुपये व सन्मानचिन्ह बाल गणेश मंडळ भट गल्लीने पटकावले, तर चौथ्या क्रमांकाचे ७,००१ रुपये नवयुवक गणेश मंडळ मंगळवार पेठला मिळाले. महाकाल गणेश मंडळाला ५,००१ रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेत अनेक गणेश मंडळांनी उत्साहाने सहभाग घेतला. लहान मुलं व मुलींनी ढोलताशा वादनाद्वारे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. काटेकोर नियोजन, शिस्तबद्ध वातावरण आणि संघटित परिश्रम हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.

राजकिशोर मोदी यांनी विजेत्यांचे अभिनंदन करताना पराभूत संघांना पुढील वर्षी नव्या जोमाने सहभागी होण्याचे आवाहन केले. संकेत मोदी यांनी सर्व गणेश मंडळांचे आभार मानत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या मित्रमंडळ सदस्यांचे कौतुक केले.

ही स्पर्धा अंबाजोगाईच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी ठरल्याचे उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले.


Categories

Recent Posts