Breaking
Updated: सप्टेंबर 29, 2025
पावसाच्या सरी बरोबरच स्पर्धकांनी लुटला दांडियाचा आनंद
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपावसाच्या सरी बरोबरच स्पर्धकांनी लुटला दांडियाचा आनंद
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-अंबाजोगाई शहराची सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा संस्कृती सदैव जोपासणारे प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तथा रोट्रॅक्ट क्लब च्या वतीने आयोजित अंबाजोगाई दांडीया महोत्सव २०२५ चा शुभारंभ शनिवारी दि २७ रोजी शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी संयोजक राजकिशोर मोदी, संकेत मोदी, डिंपल मोदी यांच्यासह प्राचार्य बी आय खडकभावी, डॉ दीपक पाटील, डॉ स्वाती शिंदे, साई फड, विवेक मस्के, आदर्श कर्णावट, समीर फड, रुपेश चव्हाण,बालाजी कदम,जुगलकिशोर सारडा, सम्यक कर्णावत , जयदेव पारीख, पल्लवी दरगड, वर्धमान कोंडेकर, राहुल कऱ्हाड, सौरभ चौबारकर, सावित्री मुंडे, अरबाज शेख, तसेच धनराज सोळंकी आदी शहरातील मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेची सुरुवात अंबाजोगाई चे ग्रामदैवत माता योगेश्वरी, मॉं दुर्गा देवीचे पूजन तसेच आरती करून करण्यात आली. मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अंबाजोगाई दांडिया महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी देखील दांडिया महोत्सव हा अतिशय उत्साह व जल्लोषात संपन्न झाला होता. यावेळी सहभागी तसेच विजेत्या स्पर्धकांना १५० च्या वर बक्षिसांच्या स्वरूपात भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. जवळपास ४५० ते ५०० दांडिया स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळेस देखील तोच उत्साह व जल्लोष दांडीत प्रेमींमध्ये पहावयास मिळत आहे. भरगोस अशा बक्षिसांची देखील लयलूट यावर्षी देखिल केल्या जात आहे. ५ ते १० वर्षाच्या लहान मुलांसह मोठ्या वयोगटातील महिला व पुरूष हे या दांडिया स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेत सहभागी होत असलेले स्पर्धक हे विविध वेशभूषा परिधान करून परीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत . यामध्ये महाराष्ट्रीयन, पाश्चिमात्य , संत विभूती त्याचबरोबर चित्रपटातील कलाकारांच्या देखील वेशभूषा साकारून या दांडिया स्पर्धेचा आनंद लुटत होते.
विजेत्या स्पर्धकांची निवड करण्यासाठी अनुभवी परीक्षकाना पाचारण करण्यात आले आहे. तसेच संचलनासाठी पुणे येथून कु तेजस्वी हि अतिशय उच्च दर्जाचे संचलन करत आहे. प्रियदर्शनी क्रीडा मंडळ व रोट्रॅक्ट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या “अंबाजोगाई दांडिया महोत्सव- २०२५ ” साठी आयोजकांनी अतिशय उत्तम दर्जाची लायटिंग ,साउंड सिस्टीम तसेच आलेल्या महिला स्पर्धकांसाठी सेल्फी पॉईंट, तात्काळ फोटो प्रिंट मिळण्याची व्यवस्था देखील स्पर्धेच्या ठिकाणी आयोजक संकेत राजकिशोर मोदी यांनी करून दिली आहे.