Breaking
Updated: नोव्हेंबर 1, 2025
बालविवाह प्रतिबंधाची शपथ घेऊन अभियानास सुरुवात
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबालविवाह प्रतिबंधाची शपथ घेऊन अभियानास सुरुवात
केज – बाल विवाह प्रतिबंध व बालक संरक्षणासाठी महाराष्ट्रात “बाल विवाह मुक्त महाराष्ट्र – आपला संकल्प” हे अभियान सुरू करण्यात आले असून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते या अभियानाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बालविवाह प्रतिबंधाची शपथ घेऊन बीड जिल्ह्यात अभियानास सुरुवात करण्यात आली.
केज येथील युवा ग्राम विकास मंडळ ही स्वयंसेवी संस्था गेल्या ४० वर्षांपासून समाजात बालकांच्या हक्क आणि संरक्षणासाठी कार्यरत आहे. जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन या देशव्यापी बालकांच्या संरक्षण करणाऱ्या नेटवर्क अंतर्गत, युवा ग्राम भागीदारी संस्था म्हणून बीड आणि धाराशिव जिल्ह्यात बाल विवाह प्रतिबंध, बाल लैंगिक अत्याचार व बालक अवैध वाहतूक प्रतिबंधात्मक कार्य करीत आहे.
महिला व बाल विकास आयुक्त यांच्या मान्यतेने महाराष्ट्रात “बाल विवाह मुक्त महाराष्ट्र – आपला संकल्प” ही १०० दिवसीय अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाचे बीड जिल्ह्यात खासदार बजरंग सोनवणे यांनी बाल विवाह प्रतिबंधाची शपथ घेऊन या मोहिमेचे उदघाटन केले. यावेळी युवा ग्राम विकास मंडळ संस्थेचे कार्यकारी सचिव एच. पी. देशमुख, प्रकल्प समन्वयक संतोष रेपे, प्रकाश काळे, सुनीता विभुते, मनीषा स्वामी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खा. सोनवणे यांनी बीड जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू अशी ग्वाही दिली. त्यांनी जिल्हा बाल विवाह प्रतिबंध कृतिदल समितीची बैठक लवकर आयोजित करावी, संबंधित विभागांना सूचना देऊन या अभियानाला यशस्वी करावे. या मोहिमेचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी या मोहिमेत सहभागी व्हावेत. बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी हातभार लावावेत.
बजरंग सोनवणे
खासदार, बीड.