Breaking
Updated: नोव्हेंबर 24, 2025
प्रचार रॅलीला आले विजयी रॅलीचे स्वरुप
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelप्रचार रॅलीला आले विजयी रॅलीचे स्वरुप
अंबाजोगाई : नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग ५ मध्ये आज झालेली प्रचारफेरी ही फेरी नव्हे, तर विजयी रॅलीच ठरली. शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा आणि प्रभाग ५ चे उमेदवार वेडे पद्माकर विजयकुमार व जोगदंड संजीवनी शिवाजी यांच्या प्रचारार्थ आमदार नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
रॅलीची सुरुवात भीमनगर कमान येथून झाली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगर, परत भीमनगर, समतानगर, शिवाजीनगर, खडकपुरा, धनगर गल्ली, शहाबटांव चौक, आमराई, बागवान गल्ली असा विस्तृत मार्ग घेत ही रॅली पुन्हा भीमनगरात संपली. संपूर्ण फेरीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, उमेदवारांचे स्वागत आणि घोषणांनी वातावरण दणाणून गेले.
रॅलीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. ठीकठिकाणी महिलांनी आ. नमिता मुंदडा यांचे औक्षण केले. गोरगरीब लोकांना घरकुलाच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत करत असलेल्या प्रयत्नांबद्दल नागरिकांनी आ. मुंदडा यांचे आभार मानले.
प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत सुविधा, नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि आगामी विकासकामांचा स्पष्ट रोडमॅप मतदारांसमोर मांडला. नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
या रॅलीत दाखवलेला जनतेचा उत्साह प्रभागातील दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याची छाप पाडणारा ठरला. नागरिकांनी दिलेला पाठिंबा हा अमूल्य असून, अंबाजोगाईच्या सर्वांगीण विकासासाठी या उमेदवारांना विजय मिळवून द्यावा, असे आवाहन आमदार नमिता मुंदडा यांनी उपस्थितांना केले.