Breaking
Updated: सप्टेंबर 27, 2025
एएसपी चेतना तिडके यांच्या निदर्शनास आला प्रकार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – लव्हुरी (ता. केज) येथे भरधाव दुचाकीने तरुणास धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणांवर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
लव्हुरी येथील वैभव दशरथ चाळक हा तरुण २३ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता लघुशंका करून दुकानाकडे येत असताना गावातील भिमराव आण्णा शिनगारे याने दुचाकी (एम. एच. ४४ एच. २१२९) भरधाव वेगात व हायगई व निष्काळजीपणे चालवून त्याला जोराची धडक दिली. या अपघातात डोक्याला मार लागून वैभव चाळक हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर केजच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अंबाजोगाईच्या रुग्णालयात नेले. तेथून डोक्याला जास्त मार असल्याने लातूरच्या रुग्णालयात हलविले. त्याच्यावर उपचार सुरू असून २६ सप्टेंबर रोजी त्याचे वडील दशरथ चाळक यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकी चालक भीमराव शिनगारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार अशोक सोनवणे हे करीत आहेत.