Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

पिशवीत ठेवण्याचा बहाणा करुन वृद्धेची सोनचांदी लंपास

Updated: नोव्हेंबर 3, 2025

By Vivek Sindhu

पिशवीत ठेवण्याचा बहाणा करुन वृद्धेची सोनचांदी लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाटोदा : शहरातील बसस्थानकाजवळ एका वृद्ध महिलेला चोऱ्याची भीती दाखवून गळ्यातील सोन्याचे दागिने पिशवीत ठेवण्याचा सल्ला देत अनोळखी महिलेने ते दागिने लंपास केल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी पाटोदा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

फक्राबाद (ता. जामखेड जि. आहिल्यानगर) येथील चंद्रभागा बापु शिंदे (वय ५९) या महिला सकाळी १० ते ११ च्या सुमारास पाटोदा बसस्थानक ते मिठाई दुकान दरम्यान येत होत्या. यावेळी अंदाजे ३५ वर्षांची अनोळखी महिला त्यांच्याशी बोलत फिर्यादीला “गळ्यातील दागिने काढून पिशवीत ठेवा, चोऱ्या होत आहेत” असा इशारा दिला. फिर्यादीने सोन्याचे मनी व डोरले अंदाजे ७ ग्रॅम किंमत सुमारे ५५ हजार रुपये काढून बॅगच्या कप्प्यात ठेवले. त्यानंतर आरोपी महिलेने संधी साधून बॅगमधील ते दागिने नकळत चोरून नेले.

घटनेनंतर फिर्यादीने तातडीने पोलिसांत धाव घेतली. पोउपनि पवार यांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळाचा तपास केला असून आरोपी महिलेचा शोध सुरू आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावधान राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Categories

Recent Posts