Breaking
Updated: ऑक्टोबर 8, 2025
पिंपळटक्का ग्रामसभेत गोंधळ; ग्रामसेवकाला धमकी देत शिवीगाळ
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelवडवणी : पिंपळटक्का गावातील ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवकासमोर अरेरावी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका इसमाविरुद्ध वडवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पिंपळटक्का ग्रामपंचायत कार्यालयात घडली. फिर्यादी आकाश सुधाकर शिंदे (वय ३५, व्यवसाय – नोकरी, रा. शिवणी, ता. बीड) हे ग्रामसेवक म्हणून ग्रामसभा घेत होते. सभेदरम्यान आरोपी हनुमंत रामेश्वर कदम (रा. पिंपळटक्का, ता. वडवणी) हा अचानक उभा राहून फिर्यादी व सरपंच यांच्याशी अरेरावीची भाषा करू लागला. “ग्रामसभा बंद करा, तुम्ही खोटे काम करता” असे म्हणून त्याने शिवीगाळ केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
या प्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी केदार करत आहेत.