Breaking
Updated: नोव्हेंबर 3, 2025
पीक वाचविण्याच्या वादातून शेतकऱ्याला दगडाने मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelधारूर : तालुक्यातील रूईधारूर येथे शेताच्या सीमेवरून मळणी यंत्र नेण्याच्या वादातून एका शेतकऱ्याला दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विनोद किसन तिडके (रा. रूईधारूर, ता. धारूर) हे आपल्या गट क्र. ३८६ मधील शेतात असताना बालासाहेब कारभारी तिडके, गोविंद बालासाहेब तिडके, श्रीमंत कारभारी तिडके आणि राहुल श्रीमंत तिडके (सर्व रा. रूईधारूर) हे मळणी यंत्र घेऊन त्यांच्या शेताच्या बाजूने जात होते.
फिर्यादीने “आमच्या शेतातून मशीन घेऊ नका, घेवड्याचे पीक नुकसान होईल,” असे सांगितल्यावर आरोपी बालासाहेब व गोविंद तिडके यांनी शिवीगाळ केली. आरोपी बालासाहेब तिडके यांनी हातातील दगड फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले, तर गोविंद तिडके यांनी पोटात आणि छातीत दगड व मुक्क्याने मारहाण केली. आरोपी श्रीमंत आणि राहुल तिडके यांनी चापट व बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली तसेच “हा लय माजला आहे, याला जिवंत ठेवायचं नाही” अशी धमकी दिली.
या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस मोरे (पो.ह. १६८७) करीत आहेत.