Breaking
WhatsApp Group
Join Nowबीड (प्रतिनिधी): बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात डॉक्टर लक्ष्मीकांत तांदळे यांच्या घरातून चोरी गेलेल्या सुमारे साडे दहा लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा तपास करून बीड शहर पोलिसांनी चोरट्याला अटक केली असून, संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
आज दि. २३ जून २०२५ रोजी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या हस्ते हा मुद्देमाल मूळ मालक डॉ. लक्ष्मीकांत तांदळे यांच्याकडे अधिकृतरित्या आणि सन्मानपूर्वक परत करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, शितलकुमार बल्लाळ, सहायक पोलीस निरीक्षक बाबा राठोड, तसेच पोलीस अंमलदार बालाजी मुळे हे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. तांदळे यांनी पोलिसांचे विशेष आभार मानले असून, बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले. या कारवाईबाबत नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाविषयी विश्वास वाढल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
Last Updated: June 23, 2025