Breaking
Updated: सप्टेंबर 3, 2025
परळीच्या इराणी गल्लीत पोलिसांचा छापा; 53 किलोपेक्षा अधिक गांजा जप्त
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी : परळी शहरातील इराणी गल्ली, शिवाजीनगर परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 53 किलो 134 ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य असा सुमारे ₹12 लाख 23 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
2 सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांना खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी छापा टाकण्यात आला. पोलिसांना पाहताच वसीम ऊर्फ शराबी अक्रम बेग आणि अक्रम रफीक बेग हे दोघे आरोपी घर सोडून पसार झाले.
छाप्यातून पोलिसांच्या हाती गांज्याबरोबरच 31 मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, पॅकिंग मटेरियल, DVR सिस्टीम, लेडीज पर्स, ड्रम, टब, रिक्षा आदी साहित्य मिळाले. जप्त केलेल्या गांज्याची बाजारातील किंमत जवळपास ₹10 लाख 62 हजार इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 183/2025, एनडीपीएस अॅक्ट 1985 चे कलम 8(क), 20, 22 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.