Breaking
Updated: सप्टेंबर 3, 2025
पाणीपुरी विक्रेत्यास मारतुल मारला, ग्राहकावर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – पाणीपुरी देण्यास उशीर केल्यावरून एका ग्राहकाने पाणीपुरी विक्रेत्यावर मारतुलने हल्ला केल्याची घटना केज शहरात घडली.
शहरातील तहसील कार्यालयासमोर बालासाहेब रामभाऊ ढवळे हे पाणी पुरी व चाट भांडारचा गाडा लावून व्यवसाय करतात. २ सप्टेंबर रोजी रोजी दुपारी दीड वाजता बंडु वैजनाथ घुले (रा. टाकळी ता. केज) याने येऊन त्यांना पाणीपुरी मागितली. त्यास बाळासाहेब ढवळे हे अगोदरच्या गिऱ्हाईकाला पाणी पुरी देत असल्याने थोडावेळ थांबा म्हणाले. त्याचा राग आल्याने बंडू घुले याने पाणीपुरी विक्रेते बाळासाहेब ढवळे याच्या अंगावर धावून मारहाण केली. मारतुलने दंडावर मारून त्यांना जखमी केले. जीवे मारण्याची धमकी ही दिली. याप्रकरणी बंडू घुलेविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार दत्तात्रय बिक्कड हे करीत आहेत.