Breaking
Updated: नोव्हेंबर 6, 2025
पलाश सुगावकरची इस्त्रोच्या सहलीसाठी निवड
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई – मुळ अंबाजोगाई येथील रहिवासी व सध्या पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या पलाश पंकज सुगावकरची इस्त्रोच्या सहलीसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
राज्यातून अशा १९ विद्यार्थ्यांची अहमदाबाद येथील इस्त्रो या विज्ञान संस्थेने निवड केली आहे. पलाश हा राज्यातून दहावा व पुणे जिल्ह्यातून तिसरा विद्यार्थी आहे. देशातील नोबेल फाउंडेशनतर्फे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रचारासाठी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा घेतली जाते. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात पलाश सुगावकर याने यश मिळवल्याने त्याची या सहलीसाठी निवड झाली.
पलाश हा कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे. जानेवारी (२०२६) मध्ये अहमदाबाद (गुजरात) येथे होणाऱ्या इस्त्रो या विज्ञान संस्थेतर्फे होणाऱ्या तिन दिवसीय प्रशिक्षणात सहभागी होणार आहे.
त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, वडील बालकांचे ह्रदयरोग तज्ज्ञ डाॅ.पंकज सुगावकर, आई, आजी, आजोबा निवृत्त प्रा. एस.बी. जोशी, काका, काकु आदींनी त्याचे कौतुक केले. हे यश मिळवून पलाशने अंबाजोगाईच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे.