Breaking
Updated: ऑक्टोबर 4, 2025
ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मविआकडून निदर्शने
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी – महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात परळीत धरणे आंदोलन करण्यात आले. जनसुरक्षा विधेयक रद्द करा, ओला दुष्काळ त्वरित जाहीर करा, विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करा, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा, या मागण्यांसाठी हे आंदोलन झाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेचे पूजन करून आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनादरम्यान नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
प्रशासनाच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. पी. एस. घाडगे, अजय बुरांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उत्तम माने, तालुकाध्यक्ष बाबा शिंदे, शिवसेना उबाठा गटाचे जगन्नाथ सोळंके, काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ उर्फ बहादूरभाई, तालुकाध्यक्ष प्रकाश मुंडे, महिला अध्यक्षा एच. यु. मुंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.