Breaking

न्यायमूर्तीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने

Updated: ऑक्टोबर 13, 2025

By Vivek Sindhu

न्यायमूर्तीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण कुमार गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व पक्षीय आंबेडकर प्रेमी आणि न्यायसंस्थेवर विश्वास असणाऱ्या घटकांच्या वतीने केज येथील तहसील कार्यालयावर १३ ऑक्टोबर रोजी तीव्र निदर्शने करण्यात आली.
देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण कुमार गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या वकीलावर खुनाचा प्रयत्न करणे आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. त्याचे समर्थन करणाऱ्या विरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच देशाच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला आणि त्याचे समर्थ करणाऱ्याला फासावर लटविण्यात यावे या मागणीसाठी केज तहसील कार्यालयासमोर १३ ऑक्टोबर रोजी सोमवारी ११ वाजता जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात नगराध्यक्षा सीता बनसोड, रिपाइंचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे, जेष्ठ नेते चंद्रकांत खरात, गौतम बचुटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल खोडसे, रवींद्र जोगदंड, विनायक लोंढे, सदाशिव वाघमारे, दिलीप कसबे, बबलू साखरे, लखन हजारे, आकाश गायकवाड, पप्पू दूनघव, बाबासाहेब मस्के, जनार्धन सरवदे, आम्रपाली गजेशिव, आश्रुबा खरात यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Categories

Recent Posts