Breaking

नाव्होली येथे दगडाने मारून महिलेचे डोके फोडले

Updated: डिसेंबर 4, 2025

By Vivek Sindhu

संमतीशिवाय शेतातून नेली पाईपलाईन; जेसीबीमुळे पिकाचे दीड लाखांचे नुकसान

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – एका मुलीचे लग्न लावून दिल्याचे तिच्या वडिलांना सांगितल्यावरून महिलेस लाथाबुक्क्याने व चापटाने मारहाण करीत दगडाने डोक्यात मारून डोके फोडल्याची घटना नाव्होली (ता. केज) येथे घडली.
नाव्होली येथील सारिका लक्ष्मण ठोंबरे (वय २२) ही महिला ४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता घरासमोर उभी होती. याचवेळी मनिषा धनराज केदार, सुभाष पाटीलबुवा ठोंबरे, भामाबाई दिनकर बिक्कड, रंविद्र बन्सी बिक्कड (सर्व रा. नाव्होली) या चौघांनी संगनमत करून सारिका ठोंबरे यांना मनीषा केदार हिच्या मुलीचे लग्न केल्याचे तिच्या वडिलांना का सांगितले असे कारण काढून शिवीगाळ, लाथाबुक्क्याने व चापटाने मारहाण कसरत मुक्कामार दिला. तर डोक्यात दगड मारून दुखापत केली. अशी तक्रार सारिका ठोंबरे यांनी दिल्यावरून वरील चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार उमेश आघाव हे करीत आहेत.


Categories

Recent Posts