Breaking

नावाला राष्ट्रीय महामार्ग, मात्र जागोजागी मृत्यूचे सापळे

Updated: ऑक्टोबर 13, 2025

By Vivek Sindhu

राष्ट्रीय महामार्गावर केज - कळंब दरम्यान जागोजागी खड्डे

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

राष्ट्रीय महामार्गावर केज – कळंब दरम्यान जागोजागी खड्डे

केज – खामगाव – सांगोला या राष्ट्रीय महामार्गावरील केज – कळंब दरम्यानच्या रस्त्यावर जागोजागी सिमेंट रस्त्याला खड्डे पडले असून त्या खड्ड्यातील लोखंडी सळ्या बाहेर निघालेल्या आहेत. यामुळे आता हा राष्ट्रीय महामार्ग नावाला झाला असून प्रवाशांसाठी जागोजागी मृत्यूचा सापळे बनला आहे.

खामगाव – सांगोला (रा. म. क्र. ५४८-सी ) या राष्ट्रीय महामार्गाला माजलगाव ते केज दरम्यान पडलेल्या भेगा आणि खचल्याने त्याची चर्चा होती. त्यावर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेकजण जायबंदी झाले आहेत. त्याचबरोबर या राष्ट्रीय महामार्गावरील केज ते कळंब दरम्यान रस्त्यावर साळेगाव, सुर्डी फाटा आणि मांगवडगाव फाटा तसेच मांजरा पूल येथे खराब झालेला आहे. अनेक ठिकाणी पुलावर खड्डे पडलेले आहेत. आधीच पुलावरचे रस्ते हे जम्पिंगचे असून त्यावरचे सिमेंट उखडून पडलेल्या खड्ड्यांमुळे त्याच्या उघड्या पडलेल्या आहेत. या उघड्या पडलेल्या सळ्या एवढ्या धोकेदायक आहेत की या सळ्या वाहनाच्या टायर किंवा थेट दुचाकी चालकांच्या शरीरात घुसून मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याचा धोका आहे. मात्र एवढा धोका दिसत असताना देखील सबंधित ठेकेदार, त्यांची यंत्रणा आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांना हे कसे दिसत नाही का ? ही सर्वजण मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत? असा सवाल वाहन चालक, नागरिक आणि प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.

अपघात झाल्यास ठेकेदार, अधिकाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करावेत

जर दुर्दैवाने या खड्ड्यांमुळे आणि उघड्या पडलेल्या लोखंडी सल्ल्यामुळे अपघात झाला. तर ठेकेदार, अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्य वधासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल करण्यात यावे. अशी मागणी ही होत आहे.

दुरुस्ती शक्य नसेल तर सूचना फलक तरी लावा

राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामे व धोकेदायक खड्डे जर बुजविणे होत नसेल तर त्या ठिकाणी सूचना फलक व साइन – ग्लो फलक लावल्यास वाहन चालकांच्या लक्षात येऊन अपघात तरी टळतील.


Categories

Recent Posts