Breaking

परळीत होणाऱ्या सातव्या मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांची निवड

Updated: ऑक्टोबर 17, 2025

By Vivek Sindhu

परळीत होणाऱ्या सातव्या मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांची निवड

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी वैजेनाथ (प्रतिनिधी) – परळी वैजेनाथ येथे १६ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ७ व्या मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांची निवड करण्यात आल्याची माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक रानबा गायकवाड व स्वागत समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

परळी वैजेनाथ येथे १६ नोव्हेंबर २०२५ रोजी ७ वे मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन शिक्षण मार्गच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक अजयकुमार गंडले हे आहेत. तर या एकदिवसीय संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी व विडंबनकार प्रभाकर साळेगावकर यांच्या हस्ते होणार आहे. या एक दिवसीय साहित्य संमेलनात मराठवाड्यातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. प्रदीप खाडे हे या संमेलनाचे स्वागतअध्यक्षपद भूषविणार आहेत. ते नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव आहेत. तसेच कै.रामभाऊ अण्णा खाडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. गतवर्षी परळी येथे झालेल्या ६ व्या मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणूनही त्यांनी यशस्वी भूमिका पार पाडली होती. या एकदिवसीय संमेलनात परिसंवाद, कथाकथन तसेच भव्य कवी संमेलन होणार असल्याने परळीकरांना साहित्यिक मेजवानी मिळणार आहे.


Categories

Recent Posts