Breaking
Updated: नोव्हेंबर 5, 2025
शेतकर्यांनो मी तुमच्या सोबत धीर सोडू नका : उद्धव ठाकरे
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelजाहिरात स्थगित करून सर्वसमावेशक जाहिरात काढण्याची धनंजय मुंडे यांची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) – राज्य सरकारने ०४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समूदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) पदाच्या सुमारे २००० तर वैद्यकीय अधिकारी (गट अ) पदाच्या १४४० जागांसाठी स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध केल्या असून यातील समूदाय आरोग्य अधिकारी पदाच्या २००० जागांमध्ये एन टी डी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही तर वैद्यकीय अधिकारी भरतीच्या १४४० जागांमध्ये एन टी प्रवर्गातील अ,ब,क,ड पैकी एकही प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही, हा या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय असून या दोन्हीही जाहिराती स्थगित करून नव्याने सर्वसमावेशक जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.
धनंजय मुंडे यांनी या संदर्भात एक्स पोस्ट व्दारे माहिती दिली असून त्यांनी याबाबतचे विनंती पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना पाठवले आहे.
राज्यभरात या प्रवर्गातील लाखो विद्यार्थी असून ते या पदांसाठी प्रयत्न करत आहेत. या पदासाठी इच्छुक असलेल्या एन टी प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी वरील अन्यायाबाबत आपल्याकडे तक्रारी केल्या असून, एकूण ३५०० जागांमध्ये एन टी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित नसणे हा एक प्रकारे अन्याय असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान कोणत्याही प्रवार्गावर शासकीय नोकर भरतीमध्ये अन्याय होणार नाही, यासाठी या दोन्हीही जाहिराती राज्य सरकारने स्थगित कराव्यात व सर्वसमावेशक पद्धतीने नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावर राज्य शासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.