Breaking

मुकादमाची चार लाखाची पिशवी पळविणारे दोघे अटक ; पाच दिवसाची पोलीस कोठडी

Updated: सप्टेंबर 11, 2025

By Vivek Sindhu

डोळ्यात चटणी टाकून महिलेचा विनयभंग ; पीडितेसह नातेवाईकांना मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – दुचाकीवरून जात असलेल्या ऊसतोड मुकादमाच्या हातातील चार लाख रुपयांची रक्कम असलेली पिशवी हिसकावून नेल्याची घटना केज – अंबाजोगाई रस्त्यावरील सरकारी दवाखान्याजवळ २९ जुलै रोजी घडली होती. या प्रकरणातील दोघांना परभणीच्या कारागृहातून केज पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
केज तालुक्यातील मानेवाडी येथील उत्तरेश्वर उत्तम धायगुडे व त्यांचे मेव्हणे रमेश वैजेनाथ माने यांनी अंबाजोगाई येथील आयडीबीआय बँकेतून चेकद्वारे चार लाख रुपयांची रक्कम काढून कॅरीबॅगमध्ये ठेवून केजला आले. येथील अंबाजोगाई रस्त्यागरील एसबीआय बँकेत आरटीजीएस गेले. मात्र त्यांना उशीर झाल्याने बँकेचे व्यवहार बंद झाल्याने परत गावाकडे जात असताना दुपारी ४.३० वाजेच्या उपजिल्हा रुग्णालयाजवळ पाठीमागून भरधाव वेगात दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी उत्तरेश्वर धायगुडे यांच्या हातातील चार लाख रुपये असलेली पांढऱ्या रंगाची कॅरीबॅग हिसकावून अंबाजोगाईच्या दिशेने निघून गेले होते. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, केज पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेज आधारे धाडसी चोरीची घटना उघडीस आणली. आंध्रप्रदेश राज्यातील नेल्लोरे जिल्ह्यातील कप्पारालथिलप्पा ता. कावली येथीलजसवंत उर्फ जश्यु शिवा पिटला (वय१८) व प्रसंगी उर्फ सन्नी एलिया चल्ला (वय ३३) या दोघांनी ही चार लाख रुपयांची पिशवी हिसकावून नेल्याचे निष्पन्न झाले. केजचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, जमादार बजरंग मुंडे, संदीप माळी यांनी या दोघांना १० सप्टेंबर रोजी परभणी येथील जिल्हा कारागृहातून न्यायालयाच्या आदेशाने ताब्यात घेतले. त्यांना केज न्यायालयात हजर केले असता १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

इतर गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता

केज पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या दोघांकडून पोलीस तपासात इतर गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


Categories

Recent Posts