Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

बीड शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Updated: जानेवारी 31, 2026

By Vivek Sindhu

केजमध्ये कृषी सेवा केंद्र फोडले; मोटारी आणि साहित्याची चोरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : शहरातील झमझम कॉलनी परिसरात एका रोडवर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना २७ जानेवारी २०२६ रोजी रात्री ७:०० ते ७:४५ वाजेच्या दरम्यान घडली असून, पीडित मुलीला त्रास देण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ३० जानेवारी रोजी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पिंक पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडगे या करीत आहेत.


Categories

Recent Posts