Breaking

डोळ्यात चटणी टाकून महिलेचा विनयभंग ; पीडितेसह नातेवाईकांना मारहाण

Updated: ऑक्टोबर 6, 2025

By Vivek Sindhu

डोळ्यात चटणी टाकून महिलेचा विनयभंग ; पीडितेसह नातेवाईकांना मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – एका महिलेच्या घरात घुसून डोळ्यात चटणी टाकून विनयभंग करीत पीडित महिलेसह तिचा पती, भाऊ व भाच्यास मारहाण केल्याची घटना युसुफवडगाव ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील एक ४७ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह केज तालुक्यात वास्तव्यास आहे. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वाजेच्या दरम्यान पीडित महिला ही शेतातून काम करून घराचे कुलूप उघडून घरात गेली असता आरोपी विकास बबन गोरे (रा. माळेगाव ह. मु. सुर्डी फाटा ता. केज) याने पाठीमागून घरात घुसला. त्याने महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून तिचा विनयभंग करीत तू चल तुला सांभाळतो. असे म्हणत महिलेस शिवीगाळ व चापटाबुक्यांनी मारहाण केली. महिलेचा भाऊ सोडविण्यास आला असता त्याला मारहाण केली. महिलेचा भाचा याने भांडण का केले अशी विचारणा केली असता त्याच्या डोक्यात मारून डोके फोडले. तर महिलेच्या पतीस काठीने मारहाण करीत आताच जेलमधून सुटून आलोय, माझं कोणी ही काही करू शकत नाही, असे म्हणत त्यांना एका एकाला गाठून जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून विकास गोरेविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार संपत शेंडगे हे करीत आहेत.


Categories

Recent Posts