Breaking

१५ लाखासाठी विवाहितेस मुलासह हाकलून दिले ; पती, सासरा, सासुवर गुन्हा

Updated: जानेवारी 2, 2026

By Vivek Sindhu

१५ लाखासाठी विवाहितेस मुलासह हाकलून दिले ; पती, सासरा, सासुवर गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – घर बांधकामासाठी तुझ्या आई – वडिलांकडून १५ लाख रुपये घेऊन का येत नाहीस या कारणावरून एका २१ वर्षीय विवाहितेस लहान मुलासह घराबाहेर हाकलून दिल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील वडजी (ता. वाशी) येथे घडली. याप्रकरणी पती, सासरा, सासुविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) हे गाव माहेर असलेल्या शितल अजय जाधवर (वय २१) तरुण महिलेचा विवाह २९ ऑगस्ट २०२२ रोजी वडजी (ता. वाशी जि. धाराशिव) येथील अजय रामेश्वर जाधवर याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर तिला एक मुलगा स्वराज झाला. तिला एक वर्षे चांगले नांदविले. त्यानंतर पती अजय जाधवर, सासरे रामेश्वर जाधवर, सासु रमा जाधवर हे तिला आई – वडिलांकडून पैसे आण म्हणून तगादा लावू लागले. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी तिच्या आई – वडिलांनी येऊन त्यांची समजूत काढून तीन लाख रुपये दिले. मात्र त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी घर बांधण्यासाठी १५ लाख रुपये घेऊन ये, अन्यथा तुला नांदवणार नाहीत. असे म्हणत सतत शिवीगाळ व लाथाबुक्याने मारहाण केली. तर तिच्या पतीला ऑनलाईन गेम खेळण्याची सवय लागल्याने त्याने खुप कर्ज करून ठेवले होते. तिने १५ लाख रुपये आणण्यास नकार दिल्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला तिच्या लहान मुलासह घरातून बाहेर हाकलून दिले. माहेरी येऊन तिने दिलेल्या तक्रारीवरून पती अजय जाधवर, सासरे रामेश्वर जाधवर, सासु रमा जाधवर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार पल्लवी तरकसे या करीत आहेत.


Categories

Recent Posts