Breaking
Updated: सप्टेंबर 4, 2025
यावर्षी १५ शिक्षकांचा १७ सप्टेंबरला किरणकुमार गित्ते यांच्या हस्ते होणार गौरव
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी -मराठवाडा साहित्य परिषदेच्या परळी शाखेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे देण्यात येणारे आदर्श शिक्षक, सेवागौरव व साहित्य गौरव पुरस्कार जाहीर झाले असून यंदा या पुरस्कारासाठी १५ जणांची निवड करण्यात आली असल्याची माहिती साहित्य परिषदेच्या परळी शाखेचे अध्यक्ष विजयकुमार वाकेकर, सचिव राजकुमार यल्लावाड, पुरस्कार निवड समितीचे प्रमुख बंडू अघाव यांनी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून साहित्य परिषदेच्या वतीने परळी तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक, साहित्य आदी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्या, योगदान देणार्या शिक्षकांचा व इतर मान्यवरांचा साहित्य परिषदेच्या वतीने गौरव केला जातो.
यावर्षी परळीसह इतर तालुक्यातील ११ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेले शिक्षक व त्यांच्या शाळा पुढीलप्रमाणे- श्याम साधू मुंडे (मुख्याध्यापक, वसंतराव नाईक विद्यालय, वरवटी ता.अंबाजोगाई), अनुपकुमार अरुण कुसूमकर (महाराष्ट्र विद्यालय, मोहा), अजय रमाकांतराव जोशी (वैद्यनाथ विद्यालय परळी), मोहन अमृतराव कांदे (मुख्याध्यापक, सरस्वती विद्यालय आचार्य टाकळी), मुरलीधर वैजनाथ कराड (मुख्याध्यापक, बालाघाट विद्यालय, दौनापूर), प्रमोद भागवतराव गादेकर (जि.प.प्रा.शा.धामोनी ता.सोनपेठ), दिगंबर बापुराव परसेवाड (जि.प.प्रा.शाळा, मांडवा), सौ.रुपाली काशिनाथराव ढाळे (जि.प.प्रा.शाळा चांदापूर), सौ.रंजना नाथराव जाधव (जि.प.प्रा.शाळा,धावडी ता.अंबाजोगाई), सौ.मंजुषा माणिकराव शिंदे (जि.प.प्रा.शा.इंजेगाव), सौ.सुषमा सुरेशराव साळेगावकर (जि.प.प्रा.शाळा, सिरसाळा) यांची निवड करण्यात आली आहे. यंदाच्या स्व.सुवालालजी वाकेकर सेवागौरव पुरस्कारासाठी येथील सेवानिवृत्त नायब तहसिलदार श्री बाबुराव रुपनर व श्री प्रदीप तुळशीराम मुंडे (मुख्याध्यापक, रत्नेश्वर विद्यालय, टोकवाडी) यांची निवड करण्यात आली आहे.
यंदाच्या साहित्य गौरव पुरस्कारासाठी अंबाजोगाई येथील ज्येष्ठ साहित्यिक अमर हबीब यांची निवड करण्यात आली आहे. तर विशेष कार्यगौरव पुरस्कार प्रा.गणेश शेषेराव चव्हाण (वैद्यनाथ महाविद्यालय) यांना देण्यात येणार आहे.
शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त येथील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी ४ वाजता त्रिपुरा राज्याचे नगर, बांधकाम, आरोग्य व पर्यटन विभागाचे सचिव व आपल्या परळीचे भूमिपुत्र किरणकुमार गित्ते यांच्यासह इतर निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य परिषदेचे अध्यक्ष विजयकुमार वाकेकर, सचिव प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड, पुरस्कार निवड समितीचे प्रमुख बंडू अघाव यांच्यासह कार्याध्यक्ष अनंत मुंडे, उपाध्यक्ष अरुण पवार, कोषाध्यक्ष प्रा.संजय अघाव, सहसचिव दिवाकर जोशी, प्रा.अर्चना चव्हाण, संपर्क प्रमुख बालाजी कांबळे, प्रसिद्धी प्रमुख सिध्देश्वर इंगोले व त्यांच्या सहकार्यांनी दिली.