Breaking

मंगळसूत्र चोरी आणि खिसा कापणारे दोन चोरटे जेरबंद

Updated: नोव्हेंबर 1, 2025

By Vivek Sindhu

मंगळसूत्र चोरी आणि खिसा कापणारे दोन चोरटे जेरबंद

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : शहर व जिल्ह्यात वाढत्या चोरी-घरफोड्या रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केलेल्या मोहिमेत दोन आरोपींना अटक करण्यात आली. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स.पोलीस निरीक्षक धनराज जारवाल यांच्या पथकाने पाटोदा पोलीस ठाण्यातील गुन्हा नोंद क्र. 351/2025, कलम 303(2) बी.एन.एस. मधील आरोपीचा शोध घेत असताना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार गणेश कचरू पवार रा. आयोध्यानगर, बीड हा आरोपी असल्याची खात्री पटल्यावर पथकाने 31 ऑक्टोबर रोजी चहाटा फाटा परिसरात त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे मनीमंगळसुत्र किमती 60 हजार रुपये जप्त करण्यात आले. या आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास पाटोदा पोलीस करीत आहेत.

दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हा नोंद क्र. 519/2025, कलम 303(2) बी.एन.एस. अंतर्गत संशयिताचा शोध घेत असताना स.पोलीस निरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या पथकाने महेश किसन गायकवाड रा. गांधीनगर, बीड यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून 35 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, स.पोलीस निरीक्षक धनराज जारवाल, पो.उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, राहुल शिंदे, अंकुश वरपे, अर्जुन यादव, अश्फाक सय्यद, मनोज परजणे आणि सिद्धेश्वर मांजरे यांनी सहभाग नोंदविला.


Categories

Recent Posts