Breaking
Updated: ऑक्टोबर 25, 2025
वाढत्या सुट्ट्यामुळे भाविकांची गर्दी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सतत होतोय खोळंबा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील भाविकांचे श्रध्दास्थान व शक्तीपीठ असलेले योगेश्वरी देवी मंदिर हे भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असून देवीकडे जाण्याच्या सर्वच रस्त्यांमधून वारंवार ट्रॅफिक जाम होते प्रशस्त रस्त्यांची, कायम स्वरूपी उपाय योजनांची गरज आहे
आणि ट्रॅफिक जाम झाल्यामुळे नागरिकांचा अक्षरशः श्वास कोंडला जातो.
अंबाजोगाई शहरातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण झाले असून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते योगेश्वरी देवी मंदिर रस्त्यावर मात्र वाढती अतिक्रमणे आणि अस्ताव्यस्त वाहने उभी असतात यामुळे वारंवार ट्रॅफिक जामच्या समस्येने अंबाजोगाईकर आणि भाविक भक्त त्रस्त झाले आहेत हा विषय वेळोवेळी डोकेदुखीचा बनला असून अनेक वेळा तात्पुरत्या स्वरूपात याबाबत उपाययोजना केली जाते मात्र नंतर तीच समस्या वारंवार उदभवते पोलीस यंत्रणा गाफीलच असते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गुरुवार पेठ योगेश्वरी देवी मंदिर कडे जाणाऱ्या या रस्त्यांवर चारचाकी वाहने, दुचाकी वाहने त्याचबरोबर फळ विक्रेते मधोमध उभारलेले असतात त्यामुळे ट्रॅफिक जामची समस्या वेळोवेळी निर्माण होते याकडे आता कोण लक्ष देणार हा खरा प्रश्न आहे सध्या दिवाळीनिमित्तच्या सुट्ट्यांमुळे राज्यभरातील भाविक हे देवी दर्शनासाठी अंबाजोगाई शहरात येतात रस्ते हे ट्रॅफिक जाम होतात आहे त्या परिस्थितीतून कसाबसा मार्ग निघतो आणि भाविक योगेश्वरी देवीचे दर्शन घेतात आणि निघून जातात प्रशासनाने वेळीच नियोजन करून उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी मागणी जनतेमधून होत आहे.