Breaking
Updated: सप्टेंबर 10, 2025
मानवलोकचे संस्थापक डॉ.द्वारकादासजी लोहिया यांची जयंती साजरी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई(प्रतिनिधी)- मानवलोकचे संस्थापक डॉ.द्वारकादासजी लोहिया यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मानवलोक,जन सहयोगच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी जेष्ठ पत्रकार नानासाहेब गाठाळ,प्रा.गोविंदराव पांडे,तहसिल कार्यालयाचे प्रशांत चौधरी,अमन लोहिया,पत्रकार प्रशांत बर्दापूरकर,राहूल देशपांडे,सुनिल चिखले आदी उपस्थित होते. बाबुजींनी विद्यार्थी चळवळीपासून ते लोकसहभाग चळवळी पर्यंत मोठा सहभाग नोंदवुन सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या पश्चातही विविध चळवळीव्दारे त्यांच्या परिवाराने बाबुजींचा वारसा पुढे चालवला असल्याचे मत प्रा.नानासाहेब गाठाळ यांनी व्यक्त केले. गोविंदराव पांडे म्हणाले की,बाबुजींचे सर्व जीवन आणि त्यांच्या चळवळी आंदोलने अगदी जवळून पाहिली आहेत त्याच बरोबर बाबुजींच्या सोबत सामाजिक क्षेत्रात काम करण्याचेही भाग्य लाभले. आणिबाणीत त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला. अलीकडच्या काळात अशा चळवळी क्वचित पहावयास मिळतात असे त्यांनी सांगितले. प्रशांत बर्दापूरकर यांनीही बाबुजींच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
प्रास्ताविकात अमन लोहिया म्हणाले की,या भूमीत अनेक सामाजिक कार्यकर्ते घडले त्यात डॉ. द्वारकादासजी लोहिया (बाबुजी)आहेत. लोकसहभागातून समाज रचनेत बदल घडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बाबुजी हे त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ते जीवंत आहेत.असे त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. द्वारकादास लोहिया (बाबुजी) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
स्वागत गीत संजना आपेट सावित्री सागरे यांनी गायिले. सुत्रसंचलन करून शाम सरवदे यांनी आभार मानले.यावेळी निराधार,वृद्ध महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.