Breaking

मानवलोकच्या वतीने जागतिक वृद्ध दिन साजरा

Updated: ऑक्टोबर 3, 2025

By Vivek Sindhu

मानवलोकच्या वतीने जागतिक वृद्ध दिन साजरा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – मानवलोक संचलित जनसहयोग कार्यालयाच्या वतीने जागतिक वृद्धदिनानिमित्त बुधवार ०१ आक्टोंबर रोजी कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब, नायब तहसीलदार स्मिता बाहेती,ज्येष्ठ नागरिक संघाचे पुंडलिक पवार,पत्रकार राहुल देशपांडे,निखिल राठोड आदी उपस्थित होते.
अमर हबीब यांनी बाबुजींच्या अनेक आठवणी सांगितल्या मानवलोक संस्थेच्या कार्याची माहिती देऊन वृद्धांना,निराधारांना आधार देणारी संस्था म्हणजे मानवलोक अशी ओळख असल्याचे ते म्हणाले.स्मिता बाहेती यांनी वृद्धांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली व शासकीय अनुदानापासून कोणीही वंचित राहणार नाही असे सांगितले. शाम सरवदे यांनी प्रास्ताविक केले. सुरूवातीला संजना आपेट, सावित्री सागरे स्वागत गीत गायिले. उपस्थित वृद्धांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी दिलीप मारवाळ यांच्यासह समाज विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.यावेळी महिला पुरुष,वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Categories

Recent Posts