Breaking
Updated: सप्टेंबर 1, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी : परळी रेल्वे स्टेशनवर सहा वर्षीय बालिकेवर अज्ञात व्यक्तीने अमानुष अत्याचार केल्याची घटना रविवारी घडली होती. या अत्याचाराच्या घटनेने परळी शहर हादरले होते. दरम्यान, पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या पाच तासांत या घटनेतील आरोपी निष्पन्न करून त्यास जेरबंद केले. शेख सजन अल्लाबक्ष (वय २७, रा. जमजमपुरा, परळी) असे त्या नराधम आरोपीचे नाव आहे.
३१ ऑगस्ट रोजी पंढरपूरहून आलेले एक कुटुंब रेल्वे स्टेशनवर मुलाबाळांसह जेवण करून झोपी गेले होते. त्याच वेळी एका नराधमाने सहा वर्षीय बालिकेला उड्डाणपुलाकडे नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देताच सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे तात्काळ परळीत पोहोचले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी रवाना केले.
संभाजीनगर पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या संयुक्त कारवाईत सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यातून शेख सजन अल्लाबक्ष यानेच हे गरीकृत्य केल्याचे निष्पन्न झाले. केवळ पाच तासांत आरोपी शेख सजन याला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.
दरम्यान, आरोपी शेख सजनच्या घृणास्पद कृत्यामुळे जिल्हाभरात संताप व्यक्त करण्यात येत असून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरीकातून होत आहे.