Breaking
Updated: सप्टेंबर 30, 2025
माल्टा देशाच्या वर्धापन दिनास रसिक कुंकूलोळ यांना अतिथीचा मान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजेागाई :- रिपब्लिक माल्टा देशाच्या ६१ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई येथील ओबेरॉय हॉटेल येथे दि.२९ सप्टेंबर रोजी एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाईचे भूमिपुत्र उद्योजक रसिक कुंकूलोळ यांना या समारंभासाठी प्रमुख अतिथीचा सन्मान उपलब्ध झाला.
या वेळी माल्टा रिपब्लिकचे भारतातील उच्च आयुक्त मी. रियुबेन गौसी व त्यांच्या पत्नी डॉ.ओल्गा गौसी तसेच मुंबई येथील रिपब्लिक माल्टाच्या मानस वाणिज्य हुनमिस, चंद्रा रूईया सरकारी टेल डॉटकॉमचे मुख्य संपादक अमेय साठे उपस्थित होते.
यावेळी बोलताना रसिक कुंकूलोळ म्हणाले की, प्रत्येक राष्ट्राने विश्व बंधुत्वाची संकल्पना जोपासल्यास आगामी काळात जगात शांतता नांदेल मानवता व नैतिक मुल्य यांची जोपासना केल्यास कोणत्याही राष्ट्राला प्रगतीकडे जाण्याचा मार्ग सापडतो. असे सांगुन त्यांनी शुभेच्छा दिल्या. अंबाजोगाई येथील भूमिपुत्र उद्योजक रसिक कुंकूलोळ यांना हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.