Breaking

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू

Updated: July 17, 2025

By Vivek Sindhu

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

मागण्या मान्य झाल्या नाही तर उद्यापासून बेमुदत संपावर जाणार

अंबाजोगाई (प्रतिनिधी): महाराष्ट्रात राज्य परिचारिका संघटनेने विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. यामध्ये प्रामुख्याने सातव्या वेतन आयोगानुसार वेतनातील असमानता आणि कंत्राटी परिचारिका भरतीला विरोध करणे, तसेच इतर प्रलंबित मागण्यांचा समावेश आहे.

राज्यातील परिचारिकांच्या बाह्य स्त्रोता‌द्वारे पदभरती व इतर संवेदनशील प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर, संघटनेने आपल्या सर्व शाखासह राज्यव्यापी आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील परिचारिका आपल्या सर्व सभासदासह सहभागी झाल्या आहेत.दि. १५ व १६ जुलै २०२२५ धरणे आंदोलन व निदर्शने आझाद मैदान मुंबई येथे करण्यात आले होते.मात्र या वेळी त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाही.त्यामुळे दि.१७ जुलै २०२५ रोजी एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.काम आंदोलनाची दखल न घेतल्यास दि १८ जुलै २०२५ पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.या वेळी संघटनेचे अध्यक्ष आशा यादव,
सचिव कृष्णा शिंदे, मीरा जाधव,उषा राठोड,रजिया शेख,छाया सानप,स्वप्निल गाडे,समीर सय्यद,दत्ता गवळी, रोशनी भालेराव,वसंत राऊत, खेलबा सोनटक्केसंघमित्रा ताटे, वर्षा सौताडेकर,आशा भोसले, माधवी भोसले,सल्लागार
दादासाहेब घोळवे, विश्रांती पवार, मेघा गुणाल, स्वप्ना आगाव, उषा गोचडे, अलका मेहकर.सह शेकडो परिचारिका उपस्थित होत्या.सह शेकडो परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

आंदोलनाची दिशा
आज संघटना व सरकारसोबत चर्चा करण्यात येणार असून यावेळी त्यांनी मागण्या मान्य केल्या नाहीत तर उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहोत.
आशा यादव
अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा अंबाजोगाई