Breaking
Updated: मार्च 21, 2026
४ किलोमीटरची विद्युत तार चोरीला; ३ लाख ९२ हजारांचे नुकसान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelनेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खाजगी कंपनीने पवनचक्कीसाठी बसवलेली ३३ केव्हीची विद्युत तार चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. आशिष अभिमन्यू बहिर (वय ३५, रा. बीड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चौसाळा ते हिंगणी दरम्यानच्या ४ किलोमीटर अंतरावरील ७८ हजार रुपये किमतीची तार अज्ञात चोरट्यांनी कापून नेली.
तार चोरी करताना चोरट्यांनी इन्सुलेटर आणि इतर सामानाचे देखील नुकसान केले असून, कंपनीचे एकूण ३ लाख ९२ हजार ७०० रुपयांचे नुकसान झाले आहे. २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान ही चोरी झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस नाईक गोळवे तपास करत आहेत.