Breaking

बीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Updated: फेब्रुवारी 28, 2026

By Vivek Sindhu

बीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड शहरातील चांदणेवस्ती पेठ भागात स्थानिक गुन्हे शाखेने एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकून ३ लाख ५९ हजार ३८८ रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. जिल्हयातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी ही मोहीम राबवली आहे.
या कारवाईची सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, चांदणेवस्ती येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये फेरोज दस्तगीर तांबोळी याने विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा मारला. पोलिसांना पाहताच संशयित आरोपी फेरोज तांबोळी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, त्याच्या घराच्या बाजूला असलेल्या शेडची झडती घेतली असता, तेथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मोठ्या प्रमाणावरील साठा मिळून आला.
या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, राहुल शिंदे, युनुस बागवान, गोविंद राख, स्वाती मुंडे, अशपाक सय्यद, मनोज परजणे आणि नितीन वडमारे यांनी सहभाग घेतला. अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांचा हा कडक इशारा मानला जात असून, फरार आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.


Categories

Recent Posts