Breaking
Updated: ऑक्टोबर 15, 2025
बीड जिल्हा कारागृहातील कथित 'धर्मांतरण' प्रकरण भोवले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी)- कर्तव्य मतिमंद मुलींचे निवासी विद्यालय अंबाजोगाई येथे सदिच्छा भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रांतिय सचिव लि. सुवर्णा महाजन यांचीही उपस्थिती होती.
याप्रसंगी लिनेस क्लब ऑफ अंबाजोगाईने प्रांताध्यक्षांच्या हस्ते मुलींना ब्लॅन्केटचे वाटप करण्यात आले. सोबत मिठाईचेही वाटप करण्यात आले. प्रांताध्यक्षांनी क्लबने आजपर्यंत केलेल्या कामाचे कौतुक केले व उपस्थित लिनेस भगिनींना मार्गदर्शन केले.
प्रांतीय सचिव यांनी उपस्थित लिनेस भगिनींना मार्गदर्शन केले. लि. प्रा.डॉ.आलका तडकलकर व लि. पुष्पा बगाडे यांचा पुस्तक प्रकाशनामुळे प्रांताध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे सर्वेसर्वा संभाजी लांडे मुख्याध्यापिका आनिता चौधरी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय लि. कमल बरुळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लि. प्रभावती तट (अवचर) यांनी केले. लिनेसच्या सचिव लि.ललिता पुजारी यांनी आजपर्यंत घेतलेल्या कार्यक्रमाचा अहवाल वाचन केले.
अध्यक्षा लि.आशा वाघमारे यांनी अध्यक्षीय समारोप केला तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लि.पुष्पा बगाडे यांनी केले. आभार लि. इंदूमती पल्लेवार यांनी मानले.
यावेळी कोषाध्यक्षा लि.आयोध्या गाठाळ, लि.गयाताई कराड, लि.डॉ. नयना शिरसाट, लि.उषा मोहिते, लि.केशर पोतदार, लि.विजया खोगरे, लि.शिला कांबळे, लि.नंदा रोहम, लि.सिमा परदेशी, लि.विलासबाई पौळ, लि.भागीरथी वाडेकर, लि.विमल गोरे, सुषमा पल्लेवार यांची उपस्थिती होती.