Breaking

लिनेस क्लब ऑफ अंबाजोगाईतर्फे शेपवाडीतील दोन शिक्षिकांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

Updated: सप्टेंबर 10, 2025

By Vivek Sindhu

लिनेस क्लब ऑफ अंबाजोगाईतर्फे शेपवाडीतील दोन शिक्षिकांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : लिनेस क्लब ऑफ अंबाजोगाईतर्फे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा शेपवाडी येथील शिक्षिका छाया चिंतामणराव राख व सुचित्रा रघुनाथ जाधव यांच्या कार्याची दखल घेत ‘लिनेस आदर्श शिक्षिका पुरस्कार’ आज (दि. ८ सप्टेंबर २०२५) प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला शेपवाडीच्या सरपंच संजीवनी सुदामराव शेप, लिनेस क्लबच्या अध्यक्षा आशा वाघमारे, सचिव ललिता पुजारी, कोषाध्यक्षा आयोध्या गाठाळ, कॅबिनेट ऑफिसर लि. प्रभावती तट, लि. उषा मोहिते, लि. वर्षा देशमुख, शितल वेडे, रेखा वेडे, इंदूबाई वेडे, शोभा शेप, गावातील महिला पालक, शिक्षक प्रशांत बिराजदार तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

या सन्मानामुळे शिक्षिका राख आणि जाधव यांच्या कार्याची दखल घेत स्थानिक शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.


Categories

Recent Posts