Breaking

वृद्ध महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

Updated: नोव्हेंबर 21, 2025

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2025 11 21 at 22.14.46 8229839a

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : गेवराई येथील वृद्ध महिलेवर निर्घृण अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ एस.आर. शिदे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच ५,००० रुपये दंड आणि तो न भरल्यास ६ महिन्यांचा सश्रम कारावास, तसेच कलम ३२३ प्रमाणे १ महिन्यांचा सश्रम कारावास अशी स्वतंत्र शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सहा सरकारी वकील अॅड. बी.एस. राख यांनी काम पाहिले.

घटना २९ डिसेंबर २०२२ रोजी पहाटे सुमारे ३ वाजताच्या सुमारास घडली. वृद्ध महिला गेवराई बसस्थानकाच्या बाजूला झोपलेली असताना आरोपीने तिच्या तोंडावर हात ठेवून दाबले, मारहाण केली आणि बळजबरीने अत्याचार केला. मारहाणीमुळे पीडितेला उठता येईना; सकाळी रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीला आवाज देत तिने आपल्या मुलाला कळवण्याची विनंती केली. त्यानंतर तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथे दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने फिर्याद नोंदवली.

फिर्यादीवरून पोलीस स्टेशन गेवराई येथे आरोपीविरुद्ध कलम ३२४ व ३७६(२)(एम) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. तत्कालीन सपोनि एस.अ. काळे यांनी तपास करून दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, गेवराई यांच्याकडे दाखल केले. त्यानंतर प्रकरण वर्ग करून जिल्हा व सत्र न्यायालय, बीडकडे पाठवण्यात आले.

सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडितेचा पुरावा, पंचांचे जबाब, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत, तपासी अधिकारी व इतर साक्षीदारांचे सविस्तर निवेदन न्यायालयाने ग्राह्य धरले. सहा सरकारी वकिल अॅड. बी.एस. राख यांच्या युक्तिवादानंतर आरोपी ज्ञानेश्वर लक्ष्मण मुंबर्डे याला दोषी ठरवण्यात आले.

प्रकरणाच्या यशस्वी न्यायनिर्णयात पोनि एस.अ. काळे, पैरवी अधिकारी एएसआय सुरेश जाधव, श्रीमती एस.ए. चव्हाण व महिला पोलीस अंमलदार यांनी सहकार्य केले. सरकारी वकिल अजय राख यांच्या मार्गदर्शनाखाली हा खटला प्रभावीपणे चालवण्यात आला.


Related Posts :

Categories

Recent Posts