Breaking

‘मनी लाँड्रिंग’ची भीती दाखवून डॉक्टरला ६ लाखांचा गंडा; पुण्यातील दोघांना बेड्या

Updated: डिसेंबर 18, 2025

By Vivek Sindhu

पुण्यातील दोघांना बेड्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: मनी लाँड्रिंगमध्ये कागदपत्रांचा वापर झाल्याची भीती दाखवून गेवराई येथील डॉक्टरची सुमारे सहा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा बीड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुणे येथून दोघांना अटक केली आहे.

डॉ. सय्यद मुक्तार (रा. गेवराई, बीड) असे फसवणूक झालेल्या तक्रारदाराचे नाव आहे. आरोपींनी मुक्तार यांना संपर्क साधून, ‘तुमच्या आधारकार्ड आणि पॅनकार्डचा वापर मनी लाँड्रिंगसाठी झाला आहे,’ अशी भीती घातली. कारवाई टाळण्याच्या बहाण्याने आरोपींनी त्यांच्याकडून ५ लाख ९५ हजार ४४१ रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुक्तार यांनी सायबर पोलीस ठाणे, बीड येथे तक्रार दिली. यावरून भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६, ६६ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुण्यातील शिरगाव आणि चिखली परिसरात सापळा रचला. या कारवाईत विकास बाबासाहेब वाघमारे (वय ३४, रा. शिरगाव, जि. पुणे) आणि महेश तुळशिराम सेटेलु (वय ४४, रा. घरकुल हाउसिंग सोसायटी, चिखली, जि. पुणे) या दोघांना अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश केळे, सपोनि संदिप अराक, तांत्रिक विश्लेषण कक्षाचे उपनिरीक्षक शेखर औटे आणि पथकाने केली. नागरिकांनी ‘डिजिटल अरेस्ट’ किंवा पोलिसांच्या नावाने येणाऱ्या बनावट फोन कॉल्सवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Categories

Recent Posts