Home »
Kaij » कुंबेफळ येथील शेतातील डीपीचा रेंगाळलेला प्रश्न नंदकिशोर मुंदडा यांनी लावला मार्गी
कुंबेफळ येथील शेतातील डीपीचा रेंगाळलेला प्रश्न नंदकिशोर मुंदडा यांनी लावला मार्गी
Updated: नोव्हेंबर 5, 2025
कुंबेफळ येथील शेतातील डीपीचा रेंगाळलेला प्रश्न नंदकिशोर मुंदडा यांनी लावला मार्गी
केज – कुंभेफळ (ता. केज) येथील ठाकरपट्टी या शेतातील दोन वर्षांपासून सतत अनेक कारणाने रेंगाळत असलेला डीपीचा प्रश्न आमदार नमिता मुंदडा यांच्या माध्यमातून समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी मार्गी लावून एक महिन्यात नवीन डीपी मंजूर करून बसवून दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा सुटला आहे.
कुंभेफळ येथील ठाकरपट्टी येथील शेतातील शेतकऱ्यांना दोन वर्षापासून सतत शेतात लाईट नसल्यामुळे आपले रब्बीचे पीक वाळून जाताना दिसत होते. तसेच त्या भागात शेतकऱ्यांच्या जनावरांना पाण्यासाठी देखील आठ-आठ दिवस लाईट उपलब्ध होत नव्हती. शेतकरी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रस्त असतो दोन वर्षापासून त्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी शासकीय अधिकाऱ्यांना कळवून देखील त्यांना लाईट मिळत नाही. मात्र शेतकऱ्यांनी आमदार समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांना भेटून दोन वर्षांपासून विजेअभावी पिके काढू शकत नाही. ही माहिती सांगितली. त्यानंतर त्यांनी आमदार नमिताताई मुंदडा यांच्या पत्राच्या आधारे जिल्हा नियोजन समिती मार्फत डीपी मंजूर करून एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना डीपी बसवून लाईट चालू करून दिली. त्यामुळे त्या डीपीवरील वीस ते पंचवीस शेतकरी व त्यांची कुटुंबियांनी आमदार नमिता मुंदडा व नंदकिशोर मुंदडा यांचे आभार मानले.
आम्ही सतत दोन ते अडीच वर्षापासून शासकीय अधिकारी अभियंता व अन्य पुढार्यांकडे जाऊन वेळोवेळी डीपीची मागणी केली. दोन वर्षापासून आमच्या शेतात लाईट नव्हती. त्यामुळे आम्ही रब्बी पिकापासून वंचित होतो. मात्र काकाजी यांनी एक महिन्यात आम्हाला नवीन शंभरचा डीपी बसवून चालू करून दिला.
शेख वाजेद,
कुंभेफळ.