Breaking

कोल्हेवाडीत भांडण ; आठ जणांवर गुन्हा

Updated: ऑक्टोबर 25, 2025

By Vivek Sindhu

कोल्हेवाडीत भांडण ; आठ जणांवर गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – कोल्हेवाडी (ता. केज) येथील सदाशिव भगवान आंधळे हे २४ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता पत्नी व मुलासह जेवण करीत असताना त्यांच्या भावकीतील गोरख उर्फ विकास अशोक आंधळे हा दारुच्या नशेत घरासमोर येऊन शिव्या देऊ लागला. ते बाहेर आले असता गोरख याने तुम्ही लग्न मोडले असे म्हणत तलवारीने त्यांच्या हातावर वार करीत जखमी केले. त्यांची पत्नी व मुलगा भांडण सोडविण्यास आले असता त्यांना ही लाथाबुक्याने मारहाण केली. अशी तक्रार सदाशिव आंधळे यांनी दिल्यावरून गोरख उर्फ विकास आंधळे याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या गटाच्या पार्वती अशोक आंधळे यांच्या तक्रारीनुसार २४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता त्या घरी एकट्याच असताना विष्णु सदाशिव आंधळे याने येऊन दार वाजविले. त्यांनी घरी कोणी नसल्याचे सांगितल्यावर विष्णू हा तेथून निघून गेला. त्यांचा मुलगा गोरख उर्फ विकास आंधळे हा घरी आल्यावर त्याला हा प्रकार सांगितला. तो विष्णूच्या घरी विचारणा करण्यास गेला असता विष्णु आंधळे, सदाशिव आंधळे, समाबाई आंधळे, केसर मिसाळ, मुंजा मिसाळ, राजेभाऊ मिसाळ, भाऊसाहेब आंधळे यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी व चापटांनी मारहाण केली. त्यानंतर पार्वती यांना घरी येऊन शिवीगाळ केली. अशी तक्रार दिल्यावरून वरील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार उमेश निकम करीत आहेत.


Categories

Recent Posts