Breaking
WhatsApp Group
Join Nowकेज – कोदरी (ता. अंबाजोगाई) येथील दत्तु रावसाहेब तिगुले हा त्याच्या राजमुद्रा किराणा दुकानातून गुटखा पानमसाला विक्री करीत असल्याची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या आदेशावरून सहाय्यक फौजदार अमजद सय्यद, जमादार संपत शेंडगे, पोलीस नाईक सुरेश गित्ते यांच्या पथकाने ३ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता छापा मारला. दुकानाची झडती घेतली असता दुकानाच्या काउंटरच्या बाजूला पांढऱ्या पोत्यात राजनिवास सुगंधी मसालाचे आठ पुडे व प्रिमियम आर एन- ०१ जाफरानी जर्दाचे आठ पुडे आढळून आल्याने पोलिसांनी हा दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस नाईक सुरेश गित्ते यांच्या फिर्यादीवरून दत्तु तिगुले विरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक फौजदार अमजद सय्यद हे करीत आहेत.
Last Updated: July 5, 2025